Healthcare Marketing Association

हेल्थकेअर मार्केटिंग असोसिएशनच्या कोर कमिटीची मीटिंग

हेल्थकेअर मार्केटिंग असोसिएशनच्या कोर कमिटीची मीटिंग

हेल्थकेअर मार्केटिंग असोसिएशनच्या कोर कमिटीची आज मीटिंग पार पडली त्यामध्ये संस्थेच्या मागील दहा वर्षांचा आढावा घेण्यात आला,

तसेच नवीन कार्यकारणीची रचना करणे, संस्थेच्या ध्येय उद्दिष्टांवर चर्चा, पदाधिकाऱ्यांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या, प्रायोजकांचे संस्थेकडून प्रमोशन करणे, आरोग्य मित्र उद्योग समूह स्थापन करणे अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. संस्थेच्या सभासदांना डोळ्यासमोर ठेवून त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विविध उपाययोजना विषयी चर्चा करण्यात आली, तसेच नवीन येऊ केलेल्या असंघटित कामगार नियमाप्रमाणे आपल्या संस्थेच्या सर्व सभासदांना असंघटित कामगारांचा दर्जा मिळवा व त्याच्या सुविधा मिळण्याबाबत प्रत्येक जिल्ह्यात तसे पत्र सहाय्यक कामगार आयुक्त यांना देण्याबाबत चर्चा करण्यात आली. संस्थेच्या सर्व सभासदांना विनंती करण्यात येते की आपणही आपापल्या परीने संस्थेच्या विविध जिल्ह्यात जिल्हा समिती स्थापन करून संस्थेच्या विस्ताराच्या कार्यास हातभार लावावा ही नम्र विनंती.

Scroll to Top