वारकऱ्यांची सेवा करण्यात विठ्ठलभक्ती- संपत पंडित
वारकऱ्यांची सेवा करण्यात विठ्ठलभक्ती- संपत पंडित हेल्थकेअर मार्केटिंग असोसिएशनच्या वतीने वारकऱ्यांसाठी आरोग शिबिर, फळ वाटप नगर दिनांक 28 – हेल्थकेअर मार्केटिंग असोसिएशनच्या जिल्हा शाखेच्या वतीने पंढरपूरच्या दिशेने विठ्ठलाच्या भेटीसाठी निघालेल्या पायी दिंडीतील सर्व भाविकांसाठी मोफत आरोग्य शिबिर व फळ वाटप करण्यात आले. दरेवाडी फाटा येथे या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपण समाजाचे काही देणे लागतो या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम राबविला आहे. वारकऱ्यांची सेवा करण्यातच विठ्ठल भक्ती आहे असे प्रतिपादन हेल्थकेअर मार्केटिंग असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष संपत पंडित यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष संपत पंडित, उपाध्यक्ष संदीप साळवे, सचिव संतोष राहींज, खजिनदार इरफान शेख सहसचिव सौरभ वैरागर, सहखजिनदार सुरज काटकर, यांच्यासह डॉ. प्रशांत निक्रड, डॉ.महेंद्र बेरड ,डॉ.करण गाडे ,तसेच दरवाडी डॉक्टर असोसिएशनचे विशेष आभार संघटनेतील इतर पदाधिकारी नवनाथ भानगुडे ,सुनील भिसे , अक्षय साठे ,संतोष शेळके ,सरफराज शेख, गणेश आरगडे , राजेश पंडित , सोमनाथ वाघ, दत्तात्रय वारकड, किशोर पोखरणा, बाळासाहेब खेडकर ,रणजीत घाडगे,बिलाल शेख ,श्रीमंत भालेराव ,राजू होळकर , सुनील महानोर , सागर आरडे ,जितेंद्र कोठारी,अतुल जोशी, राहुल घोलप,राज गांधी, अजय गांधी, अमोल फुंदे, अविनाश कुटे ,मनोज भुजाडी ,अमोल फुंदे ,संपत चाबुकस्वार ,महेश मोरे ,प्रथमेश फराटे आदी उपस्थित होते. दिंडीतील भाविकांनी मोठ्या संख्येने मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. शिबिरासाठी गजानन हॉस्पिटल व त्यांच्या स्टाफचे विशेष सहकार्य मिळाले.